निसर्ग विनाश हीच आपल्या दैनंदिन जीवनातील ‘मनोविकृती’ झाली आहे. निसर्गनाशामुळे समाजाची ‘मानसिक अवस्था’ बिघडत चालली आहे!

निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नाहिसं करण्याचा चंग बांधला आहे. हे ऱ्हासपर्व मानवकेंद्री मानलं जात असलं, तरी ते प्रत्यक्षात भांडवलशाहीकेंद्री आहे. निसर्ग खरवडून संपत्तीची निर्मिती हा तिचा बाणा आहे. या उद्ध्वस्तीकरणात धोरणकर्ते सक्रिय सामील आहेत आणि ते सामान्य माणसाला ‘लाभार्थी’ बनवण्याचा वेग वाढवत आहेत. सामूहिक विवेकशून्यता (मूर्खपणा) वाढत चालली आहे. त्यातून उत्पन्न झालेला अंतर्बाह्य कोलाहल मानवाला पेलवेनासा .......

तुकाराम शृंगारे या खासदार, केंद्रीय मंत्री आणि मराठवाडा विकास महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलेल्या नेत्यास शेवटपर्यंत स्वत:चं घर बांधता आलं नाही!

यावर आज कुणाचाही विश्वास बसणं अशक्य आहे. काही वर्षांपूर्वी अशा अनेक नि:स्वार्थी व निरलस व्यक्ती भारतीय राजकारणात सक्रिय होत्या. लातुरातील तुकाराम श्रृंगारे - टी.एस. उर्फ बाबा (२० मे १९३८ - ८ जानेवारी २०११) हे त्यापैकी एक विरळ व्यक्तिमत्त्व! श्रृंगारे (१९३८-२०११) हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी स्वत:साठी, कुटुंबीयांकरता वा स्वकीयांसाठी कोणतीही संस्था उभी केली नाही.......